Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

ना.गिरीषभाऊ महाजनांच्या आरोग्यसेवेची केरळवासियांनी घेतली दखल…!

 spnews.केरळ :-प्रत्येकापर्यंत आरोग्य सेवा पोहचविणार – ना.महाजन : नागरिकांची वाढली गर्दी
गेल्या दोन दिवसांपासून केरळ पुरग्रस्तांसाठी आरोग्यसेवा देण्यासाठी ठाण मांडून असलेल्या वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या कार्याची स्थानिक माध्यमांनी दखल घेतली आहे. ना.महाजन यांच्या आरोग्यसेवेची माहिती झाल्याने उपचार घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली होती.
वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन हे १०० जणांच्या पथकासह केरळ पुरग्रस्तांसाठी आरोग्यसेवा देत आहे. मंगळवारी केरळच्या पट्टमपितम, त्रिचुड आणि अर्नाकुल्लंम जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य तपासणीला ना.महाजन यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली होती.
स्थानिकांचे सहकार्य, अपेक्षेचा किरण
ना.महाजन यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्यसेवक यांच्याशी चर्चा करून समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्यसेवा देण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या दिवशी आरोग्यसेवा देण्याच्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचल्याने दुसऱ्या दिवशी आशेचा किरण म्हणून नागरिकांनी गर्दी केली होती.
दुर्गम भागात पोहचविणार सेवा
केरळच्या अनेक दुर्गम भागात अजूनही नागरिक आरोग्याच्या समस्येशी झगडत आहे. दुर्गम भागात आरोग्यसेवा तातडीने पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात येत असून गरज भासल्यास आणखी पथक आणि औषधी मागविण्यात येतील, असे ना.गिरीषभाऊ महाजन यांनी सांगितले.