Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

शेंदुर्णी येथे संत नरहरी महाराज जंयती उत्साहात साजरी

योगेश सोनार -शेंदुर्णी -येथील सुर्वर्णकार प्रतिष्ठानच्या वतीने सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत  संत नरहरी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याात आली . सकाळी संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीस आभिषेक करून पूजन करण्यात आले. माहेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित जंयती उत्सव कार्यक्रमात अद्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य संजय गरूड तर प्रमुख पाहूणे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल , उत्तमराव थोरात ,पंडितराव जोहरे ,विजयानंद कुलकर्णी, अमृत खलसे , सुधाकर बारी, हभप कडोबा माळी, सुवर्णकार प्रतिष्ठानचे अद्यक्ष अनिल विसपुते , मुरलीधर विसपुते , गंगाधर विसपुते , जयंती अध्यक्ष निलेश विसपुते  आदी मान्यवर उपस्थीत होते . सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व शेंदुर्णीचे आराध्य दैवत भगवान त्रिविक्रम व संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

आगळा वेगळा सत्कार —
सुवर्णकार प्रतिष्ठानातर्फे मान्यवरांचा सत्कार हार पुष्पगुच्छ न देता ‘ एक रोपटे ‘ देऊन करण्यात आला .
यावेळी माहिलासाठी , व लहान मुलांसाठी रांगोळी स्पर्धा , संगीत खुर्ची, अशा स्पर्धाचे अयोजन करण्यात आले होते . यातील विजयी स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप जेष्ठ महिला सदस्य यांच्या मार्फत करण्यात आले .

महाप्रसादाने सांगता
टाळ मृंदुंगाच्या गजरात ॥ देवा तुझा मी सोनार , तुझ्या नामाचा व्यवहार ॥या अभंगाचे गायन भगवान अहिरराव यांनी करून आणि नरहरी महाराजांचा जयघोष करत महाआरती करण्यात आली .व महाप्रसाद घेऊन कार्यकमाची सांगता करण्यात आली .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय विसपुते यांनी तर आभार सपना विसपुते यांनी मानले .
यावेळी सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.