Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

शेंदुर्णी – गरुड महाविद्यालयाची केरळ पूरग्रस्तांसाठी मदत निधी रॅली

 

spnews शेंदुर्णी:-  दिनांक 27 ऑगस्ट 2018 सोमवार रोजी अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी राष्ट्रीय सेवा योजना एकक व अण्णासाहेब भास्करराव गरुड सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शेंदुर्णी गावात केरळ पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्यासाठी रॅली संपन्न झाली रॅलीच्या माध्यमातून गावांमध्ये एकूण 17 हजार रुपये एवढा निधी गोळा झाला तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी एकूण सात हजार 100 रुपये एवढा निधी केरळ मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केला आहे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर श्याम साळुंखे यांनी आपली मुलगी आयुशी च्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून पाच हजार 100 रुपये एवढी रक्कम केरळ निधीमध्ये जमा केली आहे शेंदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दादासो संजय गरुड, सचिव सागर काका जैन, सुधाकर अण्णा बारी, नबी शहा,सामाजिक कार्यकर्ते आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उत्तम दादा थोरात,सेवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष स्नेहदीप गरुड, प्राचार्य डॉक्टर वासुदेव पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी रोहिदास गवारे यांनी गावकऱ्यांना केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले तसंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्नेहदीपभाऊ गरुड यांनी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅली बद्दलआणि मदतीबद्दल सर्व गावकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले रॅलीमध्ये उपप्राचार्य एन,एस सावळे प्राध्यापक प्रमोद सोनवणे जुनियर एनएसएस प्रमुख ,प्राध्यापक दिनेश पाटील ,प्रा, डॉ, योगीता चौधरी ,प्रा आप्पा महाजन, प्रा वानखेडे निरुपमा, विद्यार्थी विकास जिल्हा अधिकारी प्रा,अमर जावळे ल, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ,वसंत पतंगे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीसाठी सर्व दैनिकाचे पत्रकार बंधु यांचे सहकार्य लाभले तसेच डॉक्टर संजय भोळे यांनी आपल्या सुरेल आवाजात आव्हान केले डॉ, प्रशांत देशमुख , डॉ,श्याम साळुंखे प्रा,भुषण पाटील ,प्रा,ए एन,जिवरग, डॉ सुजाता पाटील,प्रा वर्षा लोखंडे,प्रा छाया पाटील,प्रा रीना पाटील ,प्रा देहरकर,प्रा,संदीप कुंभार,दीपक पाटील,प्रा,पवार, प्रा शरद पाटील,प्रा राहुल गरूड, प्रा प्रतीक्षा गायकवाड,प्रा निकम, सर्वांचे सहकार्य लाभले.